माझा राजीनामा मागण्याचा अधिकार फक्त अमित शहांना : मुनगंटीवार

माझा राजीनामा मागण्याचा अधिकार फक्त अमित शहांना : मुनगंटीवार

पिंपरी: अवनी तथा टी वन वाघिणीच्या मृत्युवरुन विरोधकांसह भाजपच्या केंद्रातील मंत्री मनेका गांधी यानी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना घेरले आहे. मनेका यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परंतु माझा राजीनामा मागण्याचा अंधिकार फक्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आहे, असे मुनगंटीवारांनी आज ठणकावले.

पिंपरी येथे हॉर्टिकल्चर असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अवनी वाघिण नरभक्षक झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसारच तिला मारण्यात आले.यात नियमांचे पालनच करण्यात आले आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही असा टोला मुनगंटीवार यांनी मनेका यांना लगावला.

Previous articleसरकारला कधी जाग येणार? : सुप्रिया सुळे
Next articleमुख्यमंत्र्यांना वास्तवाचे भान नाही; राज्यकारभार ट्विटरवरच सुरू!: विखे पाटील