धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास तीव्र आंदोलन: प्रकाश शेंडगे
मुंबई:मराठा आरक्षण दृष्टीपथात आले असतानाच धनगर समाजानेही मराठ्यांबरोबरच आरक्षण देण्याची मागणी केली आहे. सरकारने आरक्षण देण्यास टाळाटाळ केल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा
धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
शेंडगे म्हणाले की, सरकारने धनगरांना आरक्षण देण्याचे मान्य केले होते. परंतु आता ते टाळाटाळ करत असतील तर आंदोलन कसे असते, हे आम्ही दाखवून देऊ. या सरकारला आम्ही जसे खुर्चीवर बसवले तसेच त्यांची खुर्ची हिसकावण्याचीही आमची ताकद आहे, असा इशारा शेंडगे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. मंत्री महादेव जानकर धनगरांचे नेते असून त्यांनी आठ दिवसांत धनगर आरक्षणाचाही निर्णय होईल, असे आश्वासन दिले होते.