उपसमितीमध्ये राम शिंदे यांचा सदस्य म्हणून समावेश

उपसमितीमध्ये राम शिंदे यांचा सदस्य म्हणून समावेश

मुंबई  : राज्यातील मराठा क्रांती मोर्चा मागण्यांवरील निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती,इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांवरील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी उपसमिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्या अनुषंगाने महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती. या समितीमध्ये शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख व कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर या मंत्र्यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून प्रा. राम शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने काल 15 नोव्हेंबर 18 रोजी काढला आहे.

Previous articleमराठा आरक्षणासह अवनी हत्या जलयुक्त शिवार मुद्दे गाजणार
Next articleजाणत्या राजाने मराठ्यांना आरक्षण दिले नाही, ते आम्ही देतोय : विनोद तावडे