आर. आर. आबांच्या स्मारकाचे उद्घाटन मीच मंत्री म्हणून करेल : सुधीर मुगंटीवार
सांगली:आर. आर. पाटील यांचे स्मारक २०२० मध्ये पूर्णहोईल तेव्हा मीच त्याचे उद्घाटन मंत्री म्हणून करेन, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. तसेच आर. आर. आबा यांच्याकडूनच अशी धाडसी विधाने करण्याची प्रेरणा मिळते, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
मिरज रस्त्यावरील नियोजित आर.आर. पाटील स्मारकाच्या भूमीपूजन करताना मुनगंटीवार यांनी हे धाडसी वक्तव्य केले. राजकारणात आर. आर. यांच्यासारख्या चांगल्या व्यक्तींचे अस्तित्व गरजेचे आहे. आजच्या गढूळ वातावरणात प्रत्येक पक्षात चांगल्या माणसांसाठी जागा असली पाहिजे, या शब्दांतत्चांनी आर. आर. यांचा गौरव केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध पक्षांतील दिग्गज व्यासपीठावर उपस्थित होते. १८ कोटी रुपये खर्च करुन हे स्मारक उभारण्यात येणार आहे.
आर. आर. यांच्याशी असलेल्या आपल्या सौहार्द्रपूर्ण संबमधांना यावेळी मुनगंटीवार यांनी उजाळा दिला. ते म्हणाले की, मी नवखा आमदार असताना विधानसभा ग्रंथालयात गेलो आणि ग्रंथपालांना कुणाची भाषणे वाचू असे विचारले. तेव्हा त्यांनी आर. आर. आबांची भाषणे वाचा, असा सल्ला दिला. आर. आर. हे माझ्यासाठी प्रेरणा होते, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले.
डान्स बार बंदी, स्वच्छता अभियान अशा कार्यक्रमांवर आबांनी केलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. त्यांना मी माझ्या पक्षातयेण्याचे आवाहन करायचो तर ते मला तुम्ही आमच्या पक्षात हवे होता, असे म्हणायचे, असे मुनगंटीवारांनी सांगितले. मी पक्ष कधीही बदलला नसता आणि कितीही अन्याय झाला तरी बदलणार नाही, अशी ग्वाहीही मुनगंचीवारांनी दिली.
अजित पवार म्हणाले की, विलासराव, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि आबांच्या मृत्युने महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान झाले.