तीन वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या
मुंबई : राज्य सरकारने आज तीन वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव व्ही.के.गौतम यांची राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे.
डॉ.के.एच.गोविंदराज यांची महिला आणि बाल विकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनिता वैद-सिंघल यांची पर्यटन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.