विठ्ठला…मराठा आरक्षण न्यायालयात टिकू दे : चंद्रकांत पाटील 

विठ्ठला…मराठा आरक्षण न्यायालयात टिकू दे : चंद्रकांत पाटील 

पंढरपूर:राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी बळ दे आणि मराठा आरक्षण न्यायालयात टिकू दे, असे साकडे आज विठ्ठलाला घातले आहे, असे महसूलमंत्री चंद्रकां पाटील यांनी आज सांगितले. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजा करण्यापासून रोखण्यात आले होते. याची सल आमच्या सर्वांच्या मनात होती. म्हणून आम्ही कार्तिकी एकादशीच्या अगोदरच मराठा आरक्षण पूर्ण केले असे पाटील यांनी सांगितले.

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सत्तर वर्षात किती तरी आयोग झाले. पण कुणीही मराठ्यांना मागास ठरवण्याचे काम केले नव्हतै. मराठ्यांना न्याय देण्यासाठी कितीही लढाया लढण्याची वेळ आली तरी आम्ही लढू. पण मुख्यमंत्र्यांनी तयारीच अशी केलीय की तशी वेळ येणारच नाही, असा दावा पाटील यांनी केला. आयोगाने ३० टक्के मराठा समाज मागास असल्याचे मान्य केल्याने न्यायालयाच्या ५० टक्के मर्यादेचीही अडचण येणार नाही, असेही ते म्हणाले.

आज पहाटे अडीच वाजता पाटील यांनी विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली.
पाटील म्हणाले की, राज्यात तीव्र दुष्काळ आहे. त्यासाठी उपाययोजना केल्या असल्या तरीही फेब्रुवारीनंतर पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. आणखी एक पाऊस झाला तर यावर मार्ग निघेल.
मराठा आरक्षणाबाबत पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबतची कायदेशीर कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. हे आरक्षण न्यायालयात टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous articleऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विरोधातील तक्रार लोकायुक्तांनी फेटाळली
Next articleपटेलांसाठी भाजपने युगपुरुष शिवरायांना खुजे ठरवले : उद्धव ठाकरे