….हा तर सार्वभौम सभागृहाचा अवमान: जितेंद्र आव्हाड
मुंबई : सभागृहात राजदंड पळवला जातो याचा अर्थ सभागृहाचे कामकाज बंद व्हायला हवे होते मात्र अध्यक्षांनी सभागृह तहकुब केले नाही. हा एक तर राजदंडाचा अपमान आहे किंवा राज्याच्या सार्वभौम सभागृहाचा अवमान आहे असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज परंपरेनुसार चालते. सभागृहात राजदंड उचलला गेला की सभागृह बंद होते. विरोधी पक्ष अखेरचं हत्यार केव्हा उचलतो जेव्हा त्यांच्या मागण्या मान्य होत नाही किंवा राज्यात गंभीर प्रश्न म्हणजे मुस्लिम, मराठा, धनगर आरक्षण असेल किंवा दुष्काळाच्या मुदयावर सरकार टोलवाटोलवी करते म्हटल्यावर विरोधी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांकडे जावून मागणी केली व त्यानंतर राजदंड उचलला असेही आव्हाड म्हणाले.
सदस्य १० ते १५ मिनिटे राजदंड फिरवत राहिले. राजदंड दहा ते पंधरा मिनिटे फिरवला जातो याचा अर्थ सभागृहाचे कामकाज तहकुब करायला हवे परंतु सभागृहाची परंपरा आणि प्रथा मोडीत काढत कामकाज रेटूत नेण्याची सरकारची मानसिकता ही लोकशाहीला काळीमा फासणारी आहे असाही आरोपही आव्हाड यांनी केला आहे.