दोन्ही अहवाल सभागृहासमोर ठेवा तरच सभागृह चालू देवू : अजित पवार

दोन्ही अहवाल सभागृहासमोर ठेवा तरच सभागृह चालू देवू : अजित पवार

  मुंबई :  मागासवर्ग आयोगाचा आणि टीसचा अहवाल  अहवाल सभागृहासमोर ठेवल्याशिवाय सभागृहाचे कामकाज होवू द्यायचे नाही अशी भूमिका घेतली असल्याची माहिती विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

 सभागृहामध्ये अजित पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुदयावर सरकारवर  निशाणा साधला.सरकार रोज नवीन नवीन वक्तव्य करत आहे.मुख्यमंत्री वेगळे वक्तव्य करतात. उच्च न्यायालयात वेगळे सागितले जाते. सकाळी अटर्नी जनरल हायकोर्टाला वेगळे सांगतात तर दुपारी प्रख्यात सरकारी वकील सरकारच्यावतीने वेगळे सांगितले जाते आहे. तर दुसरीकडे विनोद तावडे,चंद्रकांत पाटील वेगळे सांगत आहेत. त्यामुळे जनतेला या सरकारचे काय चालले आहे हे कळेना झाले आहे. या सरकारचा आरक्षणावर वेळकाढूपणा सुरु आहे. सरकार चर्चा करावयाच्याऐवजी पळ काढण्याचे काम करत आहे. सभागृहाच्या कामकाजाचे दिवस कमी करत आहे आणि आम्ही जे मुद्दे सभागृहात मांडत आहोत त्याच्याबद्दल स्पष्ट भूमिका सरकार देत नाही असा आरोप अजित पवार यांनी केला.

Previous articleगली-गली में शोर है…विरोधकांची घोषणाबाजी
Next articleतुकाराम मुंढे यांची मंत्रालयात नियोजन सहसचिवपदी बदली