संसदेत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढवून घ्यावी :भुजबळ

संसदेत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढवून घ्यावी :भुजबळ

मुंबई : संसदेत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढवून घ्यावी, त्याशिवाय मराठा-धनगर-मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत आज विधानसभेत केली. आरक्षणाच्या प्रश्नावर आज ते विधान सभेत बोलत होते.

ते म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबतचा मागासवर्गीय आयोग अहवाल सरकारने स्वीकारला नाही, शिफारशी स्विकारल्या आहेत. अशा बातम्या काही वर्तमानपत्रात आल्या आहेत.याची सभागृहाला याची स्पष्ट माहिती मिळायला हवी. अहवाल स्वीकारला आहे की फक्त शिफारशी स्विकारल्या आहेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की, देशात ५० टक्के आरक्षणाची मर्यादा सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेली आहे. घटनेत आरक्षणाची कुठलेही मर्यादा घालून देण्यात आलेली नाही. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न निकाली काढायचा असेल तर संसदेने त्याला मंजुरी देऊन आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची गरज आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करावा केंद्रातील सर्वपक्षाचा याला नक्कीच पाठिबा मिळेल आणि हा प्रश्न निकाली लागेल. कारण आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात टिकेल याची शाश्वती नाही. त्यामुळे केंद्राततूनच आरक्षण मर्यादा वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मराठा-धनगर-मुस्लीम यांच्यासह अन्य राज्यातील जाट, पटेल इत्यादी जातींना देखील आरक्षणाचा फायदा मिळेल आणि हा प्रश्न कायस्वरूपी निकाली लागेल असे भुजबळ यांनी म्हणाले.

Previous articleमराठा आरक्षणाच्या वैधानिक कार्यवाहीसाठी मंत्रीमंडळ उपसमिती गठित
Next articleमराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार – मुख्यमंत्री