आरक्षण देण्यात विरोधकांनी अडथळा आणू नये : मुख्यमंत्री

आरक्षण देण्यात विरोधकांनी अडथळा आणू नये : मुख्यमंत्री

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम असल्याने यामध्ये विरोधकांनी कोणताही अडथळा आणू नये असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आज सकाळी गटनेत्यांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. तर दुसरीकडे मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात मांडावा या मागणीवर विरोधक ठाम आहेत. आरक्षणाच्या मागणीवरून सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करण्यात आले आहे.दुसरीकडे विरोधी पक्षांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून गेल्या आठवड्यापासून सभागृहाचे कामकाज ठप्प आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक बुधवारी विधानसभेत तर गुरूवारी विधानपरिषदेत मांडण्यात येणार आहे. कामकाजाची कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गट नेत्यांची बैठक बोलवली होती.परंतु अहवाल सादर न करताच विधेयक मांडण्याला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. काल मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक पार पाडली.आजही सभागृहात आरक्षणाच्या मुद्यावरून दोन वेळा कामकाज तहकूब करण्यात आले. तर रणनिती ठरविण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची आणि आमदारांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.

Previous articleनारायण राणेंना महाआघाडीत स्थान अशक्य: हुसेन दलवाई
Next articleमराठा आरक्षण देण्याबाबत सरकारच्या मनात पाप : धनंजय मुंडे