मराठा आरक्षण : भाजप आमदारांना व्हिप जारी

मराठा आरक्षण : भाजप आमदारांना व्हिप जारी

मुंबई:मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी येणार असल्याने भाजपने खबरदारी म्हणून आपल्या आमदारांना व्हिप जारी केला आहे. यानुसार पुढील तीन दिवस भाजप आमदारांना विधीमंडळात दिवसभर हजर राहणे अनिवार्य आहे.

मराठा आरक्षणावर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडण्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये घमासान झाले. विधेयकावरील मतदानाच्या वेळेस दगाफटका होऊ शकतो. म्हणून भाजपने आपल्या सर्व आमदारांना तीन दिवसांचा व्हिप जारी केला आहे. विधेयक येणार असल्याने सतर्कता म्हणून हा निर्णय घेतल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनाही आपल्या आमदारांना लवकरच व्हिप जारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. तिकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेले आहेत. मराठा आरक्षण विधेयकावर ठाकरे यांचेे मन वळवण्याचे ते प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येते. आज रात्री मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण कसे देता येईल, याचा, विचार केला जाणार आहे.

Previous article‘ते’ २७९ शिक्षक आता होणार नाहीत कार्यमुक्त !
Next articleउध्दव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर काय म्हणाले चंद्रकांतदादा ?