उध्दव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर काय म्हणाले चंद्रकांतदादा ?

चंद्रकांत पाटलांनी घेतली उध्दव ठाकरेंची भेट

मुंबई: मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात आणल्यावर मित्र पक्ष शिवसेनेकडून पाठिंबा मिळावा यासाठी महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी सायंकाळी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

या भेटी नंतर पत्रकारांशी बोलताना महसूलमंत्री पाटील म्हणाले की, शिवसेनेने विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी काहीही अट वगैरे घातलेली नाही. तसा काही विषयच नव्हता. शिवसेनेला पटवण्यात भाजप यशस्वी झाल्याचे दिसते आहे. मात्र विरेधकांना अद्याप का पटवता आले नाही, असे विचारल्यावर पाटील म्हणाले की, विरोधक झोपेचे सोंग घेत आहेत. आयोगाचा अहवाल पटलावर ठेवण्याची मागणी ते करत आहेत. पण अशी प्रथा नाही. ते सत्तेवर असताना असा अहवाल ठेवलाच नव्हता. मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीत अगोदर विरोधकांनी सरकारचे म्हणणे मान्य असल्याचे म्हटले होते. पण नंतर विधीमंडळात त्यांनी घूमजाव केले, असे पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला शिवसेनेच्या पाठिंब्याची अत्यंत गरज आहे. सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात संबंध कमालीचे बिघडले आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून धोका होऊ नये म्हणून भाजपने शिवसेनेची मनधरणी करण्याचा मार्ग स्वीकारला.

Previous articleमराठा आरक्षण : भाजप आमदारांना व्हिप जारी
Next articleचौकशीला सहकार्य करतोय आणि करत राहणार : अजित पवार