चौकशीला सहकार्य करतोय आणि करत राहणार : अजित पवार

चौकशीला सहकार्य करतोय आणि करत राहणार : अजित पवार

मुंबई: सिंचन घोटाळ्यास तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार जबाबदार आहेत, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल नागपूर खंडपीठात सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केल्यानंतर अजित पवार यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर मी बोलू शकत नाही. पण मी कालही चौकशीला सहकार्य केलं, आजही करतोय आणि करत राहणार आहे, असं ते म्हणाले. न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचे ते म्हणाले.

आपल्या २७ पानी शपथपत्रात एसीबीने अजित पवार यांच्या मंत्रालयाने केलेल्या अनियमिततांची जंत्री दिली असून शासकीय नियमांनुसार संबंधित खात्यांचे मंत्री हेच सर्व गोष्टींना जबाबदार असतात, हेही नमूद केले आहे.

अजित पवार म्हणाले की, मी नेहमीच सांगतोय की कायदे आणि नियम सर्वांना सारखेच असतात. भाजप शिवसेनेचं सरकार आल्यावर त्यांनी उघड चौकशी केली. ज्या ज्या वेळेला चौकशीसाठी बोलवलं किंवा प्रश्नावली पाठवली, तेव्हाही मी उत्तरं दिली आहेत. चौकशीसाठी सहकार्य करतच आहे. सरकार आपलं काम करतंय. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं मी फार काही बोलू शकत नाही आणि माझ्या वकिलांनीही तशीच सूचना दिली आहे, असं पवारांनी सांगितलं.

Previous articleउध्दव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर काय म्हणाले चंद्रकांतदादा ?
Next articleनिवडणुकीच्या तोंडावर त्रास देण्याचा प्रयत्न : छगन भुजबळ