…..आणि विरोधकांनी अध्यक्षांना घातला घेराव

 …..आणि विरोधकांनी अध्यक्षांना घातला घेराव

मुंबई : विधानसभाअध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कॉंग्रेस सदस्याच्या वर्तनावरून केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेत अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली त्यामुळे कॉंग्रेस सदस्यांनी नारेबाजी करत अध्यक्षांना घेराव घातले. या वेळी अध्यक्ष आपल्या दालनात निघून गेल्याने संतप्त विरोधी पक्षनेते विखे पाटील देखील अध्यक्षांसमोरील जागेवर गेले.

काँग्रेसचे सदस्य नसीम खान यांना समज देण्याचा सत्तारूढ सदस्यांच्या मागणीनंतर अध्यक्षांनी काढलेले उद्गार कामकाजातून काढा या मागणीसाठी काँग्रेसचे सदस्य आज सभागृहात आक्रमक होवून घोषणाबाजी करू लागले . सत्तारूढ सदस्य ही जागा सोडून पुढे आले त्यावेळी तणाव निर्माण झाला.त्यातच तालिका अध्यक्षांनी पुढील कामकाज पुकारले तेंव्हाही प्रचंड गदारोळातच लक्षवेधीचे कामकाज उरकण्यात आले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हेसुद्धा अध्यक्षांच्या जागेजवळ गेले आणि त्यानी याबाबत पक्षासाठी काहीही करण्याची तयारी असल्याचे भाष्यही केले. यावेळी अखेर ते उदगार तपासून आवश्यकता असल्यास काढून टाकण्याची घोषणा अध्यक्षांनी केली.

Previous articleतीस हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना अनुदानाचा लाभ मिळणार
Next articleनाणार जमिन संपादनाला स्थगिती: मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा.