अखेर श्रीपाद छिंदमवर तडीपारीची कारवाई

अखेर श्रीपाद छिंदमवर तडीपारीची कारवाई

अहमनगर:छत्रपती शिवरायांबद्दल अश्लाघ्य उद्गार काढणारा नगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्यावर आज तडीपारीची कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा तडीपारीचा आदेश जारी केला. खासदार दिलीप गांधी आणि माजी आमदार अनिल राठोड यांच्या मुलांना काही अटींसह शहरात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

एकूण ६६१ जणांना तडीपार करण्याचे प्रस्ताव दाखल झाले होते. त्यात आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार अरुण जगताप, आ. संग्राम जगताप यांच्यासह अनेक राजकीय व्यक्तींचा समावेश होता. आमदार कर्डिले आणि जगताप यांच्यावरील कारवाई विधीमंडळ अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी स्थगित करण्यात आली.

छिंदम याच्या उद्गारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. पालिका निवडणुकीत छिंदममुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने छिंदमवर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. भाजपला या प्रकरणाचा मोठा फटका बसू शकतो. म्हणून खबरदारी घेत गृहविभागानेच तसे आदेश दिल्याची चर्चा आहे.

Previous articleनाणार जमिन संपादनाला स्थगिती: मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा.
Next articleअसं काय आहे अहवालात की सरकारला धाकधुक वाटतेय !