मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

मुंबई : अखेर राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेले मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत चर्चेविना एकमताने मंजूर करण्यात आले.यामुळे मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळणार आहे.

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून आज विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक एकमताने मंजूर झाले आहे. हा निर्णय मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरला असून हे विधेयक विधानसभेत कोणत्याही चर्चेविनाच मंजूर करण्यात आले आहे. हे विधेयक मंजूर झाल्याने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला असून सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांचे आभार मानले.

Previous articleमराठा समाजाला १६ टक्के आरक्षण : कृती अहवाल सादर
Next articleधक्कादायक…. ७० टक्के मराठा कुटुंबे  कच्च्या घरात राहतात