शिवसेना राखणार नद्यांचे पावित्र्य : आदित्य ठाकरे

शिवसेना राखणार नद्यांचे पावित्र्य : आदित्य ठाकरे

मुंबई: शिवसेनेने स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून जोरदारपणे पुढे आणण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन राम लल्लाचे दर्शन घेतले. तर आदित्य ठाकरे यांनी शिवसेना नद्यांचे पावित्र्य शिवसेना राखणार असल्याची घोषणा आज केली.

शिवसेना राज्यातील नद्या स्वच्छ करण्याचा कार्यक्रम हाती घेणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकीकडे उत्तरेत गंगा नदी स्वच्छता मिशन जोरदारपणे राबवायला सुरूवात केली आहे. शिवसेनाही राज्यातील नद्या स्वच्छ करून त्यांचं पावित्र्य जपणार आहे. मुंबईतील मिठी, पोईसर, ओशिवरा आणि दहिसर नद्यांतील प्रदूषण रोखून त्या स्वच्छ केल्या जाणार आहेत. नंतर राज्यातील नद्यांच्या स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेतला जाईल. यासंदर्भात येत्या एक दोन दिवसांत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या दालनात बैठक आयोजित केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

शि़वसेना आगामी निवडणुकीत हिंदुत्व आक्रमकपणे हाती घेऊन जाणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. भाजपनेही हिंदुत्वाची धार तेज केली आहे. त्यामुळे पुन्हा निवडणुका हिंदुत्वाच्या मुद्यावरच प्रामुख्याने होतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Previous articleमराठा आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तिला एसटीमध्ये नोकरी
Next articleमराठा आरक्षण : न्यायालयात आम्हीच जिंकू : चंद्रकांत पाटील