मराठा आरक्षण : न्यायालयात आम्हीच जिंकू : चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षण : न्यायालयात आम्हीच जिंकू : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मागास़र्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार दिलं आहे. याविरोधात न्यायालयात काही जण जाण्याची शक्यता आहे. पण त्यांनी तसं करू नये, असं आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केलं. आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर प्रथमच ते कोल्हापुरात आले तेव्हा जोरदार स्वागत करण्यात आले.

पाटील म्हणाले की, काही जण न्यायालयात जात आहेत. त्यांनी तसं करू नये, अशी माझी इच्छा आहे. एखाद्या समाजाला आरक्षण मिळत असेल तर आपल्याला काय अडचण आहे? कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला नाही. आरक्षणामुळे मराठ्यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढणार आहे.

न्यायालयात जरी आव्हान देण्यात आले तरीही ते टिकेल. घटनातज्ञांनी एक एक वाक्य पाहून निर्णय दिला आहे. त्यामुळे आम्हीच जिंकू, असंही पाटील म्हणाले. मराठा आरक्षण टिकलं तर समाजात शिक्षणाचं प्रमाण वाढेल. धनगर समाजालाही आम्ही आरक्षण देणार आहोत, असेही पाटील यांनी आश्वासन दिलं.

Previous articleशिवसेना राखणार नद्यांचे पावित्र्य : आदित्य ठाकरे
Next articleमुंबई उपनगरातील वीज दरवाढीची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश