शिवसेनेच्या महत्वपूर्ण बैठकीला सुरूवात!

शिवसेनेच्या महत्वपूर्ण बैठकीला सुरूवात!

मुंबई : दुष्काळाच्या महत्वपूर्ण मुद्यावर चर्चा आणि पक्षाकडून करावयाच्या मदतीसाठी शिवसेना पक्षप्रमौख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, संपर्क प्रमुख,जिल्हा प्रमुख यांची बैठक सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या मंत्र्यांना दुष्काळ दौरे करण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे.

आज सकाळी ११ : ३० वाजता सेनाभवनात बोलावलेल्या या बैठकीला शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार संपर्क नेते, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, समन्वयक आणि सचिवांची उपस्थिती आहेत.या बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्याची शक्यता आहे. राज्यातल्या दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश शिवसेनेच्या आमदारांना देण्यात आले आहेत. तसेच सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत.

Previous articleनारायण राणेंची भेट घेतल्यानंतर शरद पवार काय म्हणाले ?
Next articleचिंतामणीचे दर्शन घेवून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याची सुरूवात