७२ हजार पदांच्या भरतीसाठी पुढच्या आठवड्यात जाहिरात ?

७२ हजार पदांच्या भरतीसाठी पुढच्या आठवड्यात जाहिरात ?

मुंबई : राज्य शासनातर्फे कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांची क्षेत्रियस्तरावरील सुमारे ७२ हजार पदे भरण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीकरिता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दररोज सचिव गटाची बैठक होत आहे. या मेगा भरतीची जाहिरात पुढच्या आठवड्यात जाहिरात काढण्यात येवून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरती परिक्षा घेतली जाणार असल्याचे समजते.

अर्थसंकल्पिय अधिवेशनात राज्यात ७२ हजार पदांसाठी मेगा भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.मात्र या भरतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आल्यानंतर हि भरती पुढे ढकलण्यात आली होती. आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पदभरतीच्या प्रक्रियेसाठी गती आली असून मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेल्या सचिव गटामध्ये सामान्य प्रशासन, आरोग्य, ग्रामविकास, माहिती तंत्रज्ञान, महसूल, पाणी पुरवठा, वने या विभागाचे सचिव सदस्य आहेत. मुख्य सचिवांमार्फत दररोज पदभरतीच्या प्रक्रियेबाबत आढावा घेतला जात आहे.

या पदांमध्ये ग्रामीण भागात क्षेत्रियस्तरावर काम करणाऱ्या विविध संवर्गातील पदांचा समावेश असून भरती प्रक्रिया व्यवस्थित आणि लवकर होण्याकरिता नियोजन केले जात आहे. सध्या बिंदूनामावली तपासणीचे काम सुरु असून त्यानंतर या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील, असे मुख्य सचिवांनी सांगितले.या मेगा भरतीची जाहिरात पुढच्या आठवड्यात काढण्यात येवून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परीक्षा घेतली जाणार असल्याचे समजते.

कोणत्या खात्यात किती जागा भरणार

आरोग्य खात्यात १० हजार ५६८ पदे

गृह खात्यात ७ हजार १११

ग्रामविकास खात्यात ११ हजार

कृषी खात्यात २५००

सार्वजनिक बांधकाम खात्यात ८ हजार ३३७

नगरविकास खात्यात १५००

जलसंपदा खात्यात ८२२७

जलसंधारण खात्यात २ हजार ४२३

पशुसंवर्धन खात्यात १ हजार ४७

मत्स्य खात्यात ९० पदे भरली जाणार आहेत.

 

 

Previous articleराज्य भारनियमन मुक्तच ; शेतकऱ्यांना ८ तास वीज देणार : पाठक
Next articleसुप्रिया सुळे उत्कृष्ट खासदार नव्हे तर उत्तम सेल्फीपटु :विजय शिवतारे यांचा टोला