सुप्रिया सुळे उत्कृष्ट खासदार नव्हे तर उत्तम सेल्फीपटु :विजय शिवतारे यांचा टोला

सुप्रिया सुळे उत्कृष्ट खासदार नव्हे तर उत्तम सेल्फीपटु :विजय शिवतारे यांचा टोला

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या उत्कृष्ट खासदार नाहीत तर उत्तम सेल्फीपटु आहेत, असा टोला शिवसेनेचे नेते आणि राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी लगावला आहे.

राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना एक खुले पत्र लिहीले आहे. त्यामध्ये राज्यमंत्री शिवतारे यांनी म्हटले आहे की, कात्रज घाटाचे काम सुरू होेण्यापूर्वी तुम्ही त्या ठिकाणी सेल्फी काढले. नंतर फुरसुंगीच्या ठिकाणी सेल्फी काढला. संबंधित रस्त्याच्या कामासंदर्भात आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. तुम्ही मात्र सेल्फी काढण्यातच मग्न राहिलात, असा टोला राज्यमंत्री शिवतारे यांनी लगावला आहे.

सेल्फी काढणे, आरोग्य शिबिरे किंवा जिल्हा परिषदेच्या योजनेतुन सायकलीचे वाटप करणे यासाठी खासदार होण्याची गरज नाही. पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातूनही ही कामे करता येतील. त्यासाठी खासदाराची जागा अडवून ठेवण्याची गरज नाही, अशी टीका शिवतारे यांनी आपल्या पत्रातुन केली आहे. केंद्राकडून एकही प्रकल्पही आणू शकला नाही किंवा एक पैसाही रस्त्यांसाठी आणता आला नाही, अशा शब्दात शिवतारे यांनी समाचार घेतला आहे. ‘सेल्फी विथ सुप्रिया सुळेज वर्क्स’ अशी मोहीम राबवा, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला आहे.

Previous article७२ हजार पदांच्या भरतीसाठी पुढच्या आठवड्यात जाहिरात ?
Next articleदुष्काळात सापडलेल्या वधूपित्यांना ‘लेक’ देणार मायेचा आधार