ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे ठरल्या तेलंगणात स्टार प्रचारक

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे ठरल्या तेलंगणात स्टार प्रचारक

आदिलाबाद : येत्या ७ डिसेंबर रोजी होणा-या तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज कांही विधानसभा क्षेत्रात जोरदार प्रचार सभा घेतल्या. स्वच्छ प्रशासनासाठी भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागांसाठी ७ तारखेला मतदान होत आहे. निवडणूक प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी पंकजा मुंडे यांनी आदिलाबाद जिल्हयात इचोडा आणि खानापूर येथे जाहीर सभांना संबोधित केले. हा भाग लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना मानणारा आहे. बोथ (आदिलाबाद) विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राजू मडावी यांच्यासाठी इचोडा येथे तर उमेदवार अशोक सटला यांच्या प्रचारार्थ खानापूर येथे पंकजा मुंडे यांनी सभा घेतली. या सभांना मतदारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . इंद्रवेली, इचोडा, खानापूर येथे रस्त्यात ठिक ठिकाणी वंजारी समाज बांधवांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

यावेळी बोलतांना पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गोरगरीबांसाठी अनेक योजना आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली असल्याचे सांगितले. तेलंगणात स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार स्थापन करायचे असेल तर भाजप शिवाय पर्याय नाही. विकासाची गंगा आणून राज्याला प्रगतीकडे नेण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

• इचोडा येथील सभा आटोपून इंद्रवेली कडे जातांना रस्त्यात वाहनांचा ताफा थांबवून पंकजा मुंडे यांचे जंगी स्वागत

• स्वागतासाठी रस्त्यावर फुलांचा सडा; लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जोरदार घोषणांनी वातावरण भारावले

• राष्ट्रसंत भगवानबाबा आणि मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे ठिक ठिकाणी पूजन

Previous articleशेतकरी कंपन्यांना एमआयडीसीमध्ये मिळणार जागा :  सुभाष देसाई 
Next articleमाधुरी दीक्षित पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार ?