माधुरी दीक्षित पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार ?

माधुरी दीक्षित पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार ?

पुणे : धक धक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोदार चर्चा असून, भाजपच्या उमेदवार म्हणून पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या लोकसभा निवडणूकीत पुणे लोकसभा मतदार संघावर भाजपने आपला झेंडा फडकवला असताना आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात धक धक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित भाजपच्या उमेदवार ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच मतदार संघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. नंतर पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिल्यानंतर अभिनेत्री माधुरी दीक्षित या मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

काही महिन्यापूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शहा भाजप संपर्क अभियानासाठी मुंबई दौऱ्यावर आले असता त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या जुहू येथील घरी जावून भेट घेतली होती. या भेटीत अमित शहा यांचे आदरातिथ्य मराठमोळ्या पद्धतीने करण्यात आले होते. या भेटीच्या वेळी मराठमोळे कांदे पोहे आणि चहा, कॉफी देऊन शहा यांचे स्वागत करण्यात आले होते. या भेटीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. या भेटीत माधुरी दीक्षित यांच्यासह त्यांचे पती यांच्याशीही शहा यांनी अनेक विषयावर चर्चा केली होती.

आगामी निवडणूकीत देशातील अनेक सेलिब्रेटींना भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. काही क्रिक्रेट खेळाडूचाही त्यात समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणंकीसाठी भाजपने देशव्यापी सर्वेक्षणही केले असून,या सर्वेक्षणानुसार धक धक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षितला सुद्धा भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यातून भाजपचे अनिल शिरोळे हे लोकसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत.

Previous articleग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे ठरल्या तेलंगणात स्टार प्रचारक
Next articleमेगा भरतीत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण: शासन निर्णय जारी