मेगा भरतीत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण: शासन निर्णय जारी

मेगा भरतीत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण: शासन निर्णय जारी

मुंबई : पुढील काही दिवसामध्ये राज्य सरकार सुमारे ७२ हजार पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढणार असून, या मेगा भरतीमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळणार आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.सरळसेवा भरतीत आरक्षणाच्या तरतुदीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात येवून सुधारित बिंदूनामावली निश्चित केली आहे.

सामाजिक आणि शैक्षणिक हा नविन प्रवर्ग तयार करण्यात येवून त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या लोकसेवा मधिल शासकीय, निमशिसकीय, सेवेत सरळसेवा भरतीच्या पदांचे आज सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण निश्चित केले आहे.या निराणयानुसार यापुढील रिक्त असणारी पदे ही सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी म्हणजेच मराठा समाजासाठी आरक्षित असणार आहे.

हा निर्णय राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका,नगरपालिका,शैक्षणिक संस्था,स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्हा परिषद, महामंडळे, विद्यापीठ, सहकारी संस्था, शासकीय उपक्रम,इत्यादींना लागू राहिल.हा आदेश ३० नोव्हेंबर २०१८ पासून लागू करण्यात आला असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आला असल्याने यापुढील सर्व भरतीमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळणार आहे.सरळसेवा भरतीत आरक्षणाच्या तरतुदीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाला समाविष्ट करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने सुधारित बिंदूनामावली निश्चित केली आहे. ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता उर्वरित ४८ टक्के खुल्या प्रवर्गातून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे.

राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया सुरु झाली असून ७२ हजार पदांच्या भरतीसाठी पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिध्द होवून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.३० नोव्हेंबर २०१८ रोजी रिक्त असलेली पदे आणि त्यानंतर सरळसेवा कोट्यातील रिक्त होणारी संभाव्य पदे भरताना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गात यापुढील भरती प्रक्रियेत मराठा समाजाला गणले जाणार आहे.

एकूण ७२ हजार पदे भरली जाणार  असून,पहिल्या टप्प्यात ३६ हजार तर दुसऱ्या टप्प्यात – ३६ हजार पदे भरली जातील.सध्या राज्यात १ लाख ८० हजार पदे रिक्त आहेत.७२ हजारांपैकी ५ हजार पदे क्लास १ आणि क्लास २ संवर्गातील आहेत.६७ हजार पदे क्लास ३ आणि क्लास ४ संवर्गात भरली जातील.

मेगा भरतीत कोणत्या विभागात किती पदे भरणार  

ग्रामविकास विभाग – ११ हजार ५ पदे

सार्वजनिक आरोग्य विभाग – १९ हजार ५६८ पदे

गृह विभाग – ७ हजार १११ पदे

कृषी विभाग – २ हजार ५७२ पदे

पशुसंवर्धन विभाग – १ हजार ४७ पदे

नगरविकास विभाग- १ हजार ६६४ पदे

सार्वजनिक बांधकाम विभाग – ८३७ पदे

जलसंपदा विभाग – ८२७ पदे

जलसंधारण विभाग – ४२३ पदे

मत्स्यव्यवसाय विकास विभाग- ९ पदे​

Previous articleमाधुरी दीक्षित पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार ?
Next articleबाबासाहेबांचे समतेचे स्वप्न साकार करणार :मुख्यमंत्री