संभाजी भिडे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीने खळबळ

संभाजी भिडे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीने खळबळ

कोल्हापूर: शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी आज अचानक महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यामुळे खळबळ उडाली असून, भेटीचे नेमके कारण काय, याबाबत गूढ राहिले आहे. स्वत: भिडे यांनी ही भेट खासगी होती, इतकेच सांगितले.

संभाजी भिडे कालच चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार होते. परंतु पाटील आपल्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने भेट होऊ शकली नाही. आज सकाळी भिडे गुरूजी पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झाले. सुमारे १५ मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र कशासंदर्भात भेट होती, हे स्पष्ट झाले नाही.
भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी भिडे संशयित आरोपी आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे. त्यांच्या विरोेधातील गुन्हेही मागे घेतले आहेत. वादग्रस्त विधानांमुळेही ते चर्चेत होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ होता, माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर अपत्यप्राप्ती होतेच, अशा त्यांच्या विधानांमुळेच मोठाच वाद निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर भिडे यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्यास महत्व आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Previous articleशहरांच्या नामांतरांपेक्षा अयोध्येत राममंदिर होणे महत्वाचे: उद्धव ठाकरे 
Next articleचालक, वाहकसह शिपाई यांना आता लिपिक पदावर पदोन्नतीसाठी २५ टक्के आरक्षण