राज ठाकरे माझीच कॉपी करत करतात : प्रकाश आंबेडकर

राज ठाकरे माझीच कॉपी करत करतात : प्रकाश आंबेडकर

मुंबई:मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपने ओवेसीच्या मदतीने दंगली घडवण्याचा कट रचला असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज बोचरी टीका केली. राज ठाकरे यांना डोके नाही. ते माझीच कॉपी करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. राज्यातील भाजप सरकारने निवडणुका जिंकण्यासाठीच मराठा आरक्षण दिले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ओवेसींच्या मदतीने जातीय दंगली घडवण्याचा कट रचल्याची माहिती देणारा फोन आपल्याला आला होता, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महिनाभरापूर्वीच मी हे सांगितले होते. राज ठाकरे माझीच कॉपी करत आहेत.

मराठा आरक्षणावर ते म्हणाले की, मराठा समाजाची मते मिळवण्यासाठीच त्यांनी आरक्षण दिले आहे. मराठा समाजाची मते मिळाल्यास भाजपच्या जागा १७० पर्यंत वाढतील, असे मुख्यमंत्र्यांना वाटत असेल. पण मी त्यांच्या आनंदात खडा टाकू इच्छित नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. मराठा समाजाला आरक्षण दिल्याने ओबीसी समाजात भीती निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.

दादर स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास त्यांनी विरोध केला. दादरला ऐतिहासिक महत्व आहे. अशा ऐतिहासिक ठिकाणांची नावे बदलली जाऊ नयेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Previous articleराम शिंदे यांचे शेतकरी विरोधी वक्तव्य हीच सरकारची खरी मानसिकता : मुंडे
Next articleग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी परळीत केले महामानवाला अभिवादन