महिला आरक्षणासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे:शरद पवार

महिला आरक्षणासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे:शरद पवार

मुंबई:महिला धोरणाला २५ वर्षे पूर्ण होत असताना महिला आरक्षणावर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. संकटात असताना जनतेने केलेल्या मागण्यांना राजकीय पक्ष तातडीने होकार देतात, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

महिला स्वयंसिद्धतेकडे वाटचाल या कार्यक्रमात पवारांनी आपली भूमिका मांडली. महिलांना कमी लेखले जाते याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, पोलिस।खात्यात महिलांना फक्त बंदोबस्ताची कामे दिली जातात. त्यांच्यावर विश्वासाने जबाबदारी का टाकली जात नाही, असा सवाल त्यांनी केला. कर्तृत्वात कमतरता नसते तरीही महिलांना संधी दिली जात नाही, ही मानसिकता बदलली पाहिजे, असे ते म्हणाले.

हिलांबाबत मालमत्ता अधिकारांची अंमल बजावणी योग्य रित्या होत नाही असे सांगून पवार म्हणाले की, यास त्याच जबाबदार आहेत. कौटुंबिक कलह होऊ नये, असा विचार त्या करतात. महिलांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे.

दरम्यान पवार यांनी महिला आरक्षणाबाबत चर्चा छेडली असून त्यावर आता इतरही पक्षांना भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हा मुद्दाही गाजू शकतो.

Previous articleतर माझ्या घरची पाच जनावरे मुख्यमंत्र्यांच्या घरी नेऊन सोडेल : मुंडे
Next articleकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना धक्काबुक्की