केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना धक्काबुक्की

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना धक्काबुक्की

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमात धक्काबुक्की करण्यात आली आहे. याप्रकरणी धक्काबुक्की करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले अंबरनाथ मधिल एक कार्यक्रम संपवून स्टेजवरून खाली उतरत असताना त्यांच्या दिशेने एक तरूण धावत गेला आणि त्यांने रामदास आठवलेंना  धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. आठवलेंना धक्काबुक्की करणाऱ्या तरूणाला आरपीआयच्या कार्यकर्त्यांनीही त्याच ठिकाणी धरून चांगलाच चोप दिला. या तरूणाने रामदास आठवलेंना धक्काबुक्की का केली याचे कारण  अद्याप समजू शकलेले नाही.परंतु या तरूणाला अंबरनाथ  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आठवले स्टेजवरून खाली उतरत असताना या तरंणाने आठवलेंना धक्काबुक्की केली.त्याचवेळी कार्यक्रम स्थळी एकच  गोंधळ उडाला. या तरूणाला  आठवलेंच्या सुरक्षा रक्षकांनी आणि कार्यकर्त्यांनी वेळेत  बाजूला खेचले आणि चोप दिला असला तरी   हल्ल्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Previous articleमहिला आरक्षणासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे:शरद पवार
Next articleप्रविण गोसावीने का केली रामदास आठवलेंना धक्काबुक्की ?