पुरेसा पोलीस बंदोबस्त असता तर कालची घटना टळली असती : आठवले

पुरेसा पोलीस बंदोबस्त असता तर कालची घटना टळली असती : आठवले

मुंबई :पोलीसांनी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवला असता तर काल घडलेली घटना टाळता आली असती असे सांगतानाच ,पोलीस बंदोबस्त पुरवत नसल्याचा गंभीर आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर आज अंबरनाथ बंदची हाक देण्यात आली असून, शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

काल अंबरनाथमधील जी घटना घडली ती वाईट होती. गाडीतून उतरल्यानंतर माझ्यावर प्रविण गोसावीने हल्ला केला. यावेळी घटनेवेळी पोलीस हजर असते तर ही घटना टाळता आली असती असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगून, पोलीस आपल्याला सुरक्षा पुरवत नाहीत असा आरोप केला आहे. ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जातो त्या त्या ठिकाणी कार्यकर्तेच आजुबाजुला असतात, असे आठवले म्हणाले.या तरूणाची चौकशी करून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आठवलेंनी केली.

दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ अंबरनाथ, बांद्रे या ठिकाणी बंद पाळण्यात आला आहे तर काही ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून, कार्यकर्त्यांनी शांतता पाळण्याचे आवाहन आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. माझी प्रगती काही लोकांना पाहवत नाही असे सांगून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आठवले यांनी केली.आहे. आरपीआयचे एक शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

Previous articleप्रविण गोसावीने का केली रामदास आठवलेंना धक्काबुक्की ?
Next articleधुळ्यात ६०, तर अहमदनगरमध्ये ६७ टक्के मतदान