२०१९ च्या ‘खेलो इंडिया’चे यजमान पद महाराष्ट्राला  : तावडे

२०१९ च्या ‘खेलो इंडिया’चे यजमान पद महाराष्ट्राला  : तावडे

नवी दिल्ली : महाराष्ट्राला मिळालेल्या यजमान पदाचे सोने करू या; सगळया खेळाडूंचे स्वागत करू या. अशा शब्दात ९ जानेवारी २०१९ पासून सुरू होणा-या ‘खेलो इंडिया-२०१९’ शालेय क्रीडा स्पर्धेचे यजमान पद महाराष्ट्राला घोषित झाल्यानंतर   क्रीडा व सांस्कृतिक मंत्री  विनोद तावडे यांनी ही प्रतिक्रिया  आज येथे दिली.

 येथील ताज हॉटेलमध्ये  ‘खेलो इंडिया’ २०१९ च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राला खेलो इंडियाचे यजमान पद मिळाल्याचे जाहीर  केले. या कार्यक्रमात केंद्रिय युवा व क्रीडा राज्य मंत्री(स्वतंत्र प्रभार) कर्नल राज्यवर्धन राठोड, महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री श्री तावडे, व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   खेलो इंडिया -२०१९ हा कार्यक्रम भारतीय क्रीडा प्राधिकरण, केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि स्पोर्टस इंडिया यांच्या संयुक्त विद्यामाने पुण्यात आयोजित होणार आहे.

 क्रीडा मंत्री  तावडे म्हणाले,  महाराष्ट्राला मिळालेल्या यजमान पदाचे सोने करू या….. या शब्दात महाराष्ट्राला मिळालेल्या यजमान पदाचे स्वागत श्री तावडे यांनी यावेळी केले.

ते म्हणाले,  खेलो इंडिया म्हणजे सतत खेळा,  लहानपणापासूनच मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करा. त्यांच्यातील खेळाचे कौशल्य ओळखून त्यांचा विकास करा. प्रधानमंत्री आणि केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्या प्रयत्नातून ‘खेलो इंडिया’ पर्वाची सुरूवात झाली.

या शालेयस्तरावरील क्रीडा स्पर्धा प्रथम  देशाच्या राजधानीत आयोजित झाल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्राने व्दितीय क्रमांक पटकावला होता. 2019 मध्ये होणा-या स्पर्धांसाठी विविध राज्यांमधून केवळ महाराष्ट्राला यजमान पदाचा मान मिळाला, असे सांगून  तावडे म्हणाले, यजमान पद मिळण्याचे दोन फायदे आहेत. आपल्या मातीतील खेळाडूंना मैदानात येऊन प्रोत्साहन देता येईल तसेच  देशभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडू राज्यातील येतील. त्यांचा खेळ बघायला मिळेल, यासह त्यांच्यापासून प्रेरणा घेता येईल. यासर्वांमधून क्रीडा संस्कृतीला पोषक वातावरण तयार मिळेल.

Previous articleसीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्याला बळ देण्यासाठी धनंजय मुंडे आज बेळगांव मध्ये
Next articleभाजप-शिवसेनेचे भांडण म्हणजे ‘वरून तमाशा, आतून कीर्तन’!: खा. चव्हाण