नगरपालिका निवडणूकीत भाजपाच नंबर वन

नगरपालिका निवडणूकीत भाजपाच नंबर वन

मुंबई : राज्यातील ६  विविध नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूकीत भाजपने सर्वाधिक ३७ जागा जिंकत बाजी मारली आहे . एकूण ३ ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष विजयी झाले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील निर नबाबपूर नगरपालिकेत शिवसेनेचा तर चंद्रपूर मधिल ब्रम्हपूरी नगरपालिकेत कॅांग्रेसचा नगराध्यक्ष विजयी झाला आहे.

राज्यातील विविध ६ ठिकाणच्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला आहे.  एकूण १०९ जागांपैकी भाजप ३७, शिवसेना १४, कॅांग्रेस २७, राष्ट्रवादी ६, अपक्ष ७ तर आघाड्यांना १८ जागा मिळाल्या आहेत.तर सहा पैकी ३ ठिकाणी भाजपचा,शिवसेना,कॅांग्रेस, आघाडीला प्रत्येकी १ नगराध्यक्षपद मिळविता आले आहे.जळगाव जिल्ह्यातील शेंदूर्णी नगरपालिकेच्या एकूण १७ जागांपैकी भाजप १३, राष्ट्रवादी ३, कॅांग्रेसला एक जागा मिळाली आहे.या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष विजयी झाला आहे.नांदेड जिल्ह्यातील लोहा  नगरपालिकेच्या एकूण १७ जागांपैकी भाजपने १३ तर ४ जागा कॅांग्रेसने जिंकल्या आहेत. या ठिकाणी भाजपने नगराध्यक्षपदावर बाजी मारली आहे.यवतमाळ जिल्ह्यातील निर नबाबपूर नगरपालिकेच्या एकूण १८ जागांपैकी शिवसेनेला ९, कॅांग्रेसला ४, राष्ट्रवादीला ३ तर अपक्षांनी २ जागा जिंकल्या आहेत.या नगरपालिकेत नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली आहे.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड नगरपालिकेच्या एकूण २० जागांपैकी वाशिम जिल्हा विकास आघाडीला ११ जागा, कॅांग्रेस शिवसेना आणि प्रत्येकी ३ जागा जिंकता आल्या. या ठिकाणीचे नगराध्यक्षपद वाशिम जिल्हा विकास आघाडीला मिळाले आहे.नागपूर मधिल मौदा नगरपालिकेत एकूण १७ जागांपैकी भाजप ८, कॅांग्रेस ५, शिवसेना आणि अपक्षांना प्रत्येकी २ जागा मिळाल्या आहेत. मौद्याचे नगराध्यक्षपदी भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे.सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या ब्रम्हपूरी नगरपालिकेत कॅांग्रेसने १० जागा जिंकत बाजी मारली आहे. तर या ठिकाणी भाजपला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. स्थानिक आघाडीला ७ जागेवर विजय प्राप्त करता आला असून येथिल नगराध्यक्षपदी कॅांग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे.

Previous articleलढाई मतांची नाही तर मातीची आहे , तुमच्या खांद्याला खांदा देऊन लढेल : धनंजय मुंडे
Next articleमहसूल विभागातील २३० पदांसह ३४२ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध