फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा : मलिक

फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा : मलिक

 मुंबई : निवडणूक प्रतिज्ञापत्रात फौजदारी गुन्हे लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी गमावला आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांची निवडणूक रद्द होईल तेव्हा होईल परंतु त्यांनी मुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

 सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हयाची माहिती लपवल्याप्रकरणी नोटीस बजावली असून मुख्यमंत्र्यांच्या या पारदर्शक कारभारावर  मलिक यांनी जोरदार टिका केली आहे.निवडणूक लढत असताना उमेदवाराने शैक्षणिक योग्यता, संपत्तीची माहिती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देणे बंधनकारक असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन फौजदारी गुन्हयाची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवली असून त्याबाबत सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे असेही मलिक यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी नैतिकतेच्या गप्पा मारतात.पारदर्शक कारभार असला पाहिजे असे सांगताथ आणि दुसरीकडे स्वत:वरील दोन गुन्हे लपवणे हा किती पारदर्शक कारभार आहे हे याच्यातून सिध्द झाले आहे असा आरोपही  मलिक यांनी केला.

Previous articleमराठा आरक्षणाविरुद्धच्या याचिकेवर ॲड. हरिष साळवे मांडणार शासनाची बाजू
Next articleसीमा भागातील मराठी जनतेला न्याय, त्यांच्या लढ्याला बळ व पाठींबा द्या :मुंडे