राम मंदिराचा निर्णय घेणे न्यायालयाचे काम नाही : संजय राऊत
मुंबई:राफेल प्रकरणी भाजपला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देताना किंमत ठरवणे हे न्यायालयाचे काम नाही, असा निवाडा दिला. यावर प्रतिक्रिया देताना राम मंदिर मुद्यावर आग्रही भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने राम मंदिराबाबत निर्णय घेणे हेही न्यायालयाचे काम नाही, असे म्हटले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, न्यायालयाने काहीही चुकीचे सांगितलेले नाही. राफेलची किंमत ठरवणे न्यायालयाचे काम नाही. तसेच राम मंदिराबाबत निर्णय घेणे हेही न्यायालयाचे काम नाही. राम मंदिर बांधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. परंतु मध्येच शिवसेनेने मंदिर मुद्दा भाजपकडून हायजॅक करण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौराही घडवून आणला.
राऊत म्हणाले की, राफेल कराराचा मुद्दा संसदेत सोडवला जाऊ शकतो.मात्र तो सर्वोच्च न्यायालयात सोडवला जाऊ शकत नाही. राम मंदिरावर निर्णय घेणे हे न्यायालयाचे काम नाही, असे राऊत यांनी सांगितले.
बोफोर्सप्रमाणे राफेल घोटाळ्याचा निर्णयही जनतेच्याच न्यायालयात होईल. राफेल घोटाळ्याबाबतीत राहुल गांधी यांनी दे वादळ उभे केले त्यामुळे तीन राज्यात भाजपचा पराभव झाला, अशी स्तुतीसुमनेही उधळली. विजय मल्ल्याबाबत नितीन गडकरी यांच्या विधानाचा समाचार घेताना राऊत म्हणाले की, गडकरी आजारी असल्याने त्यांना नेमके ठाऊक नसेल. त्यांनी क्लिन चिट देऊन टाकली असेल.