जनता आता भाजपला घरी बसवेल : पृथ्वीराज चव्हाण

जनता आता भाजपला घरी बसवेल : पृथ्वीराज चव्हाण

नाशिक:कॉंग्रेस आगामी सर्व निवडणुकांमध्ये सर्व राज्यांत मित्रपक्षांबरोबर आघाडी करणार आहे. मध्यप्रदेशसह तीन राज्यांमध्ये जनतेने भाजपला नाकारले आहे. येत्या निवडणुकीत जनताच भाजपला घरी बसवेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. तीन राज्यांतील निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांना यश मिळाले आहे, असेही ते म्हणाले. यावेळी भाजपवर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.

चव्हाण म्हणीले की, जनता पंतप्रधान मोदी यांच्या थापेबाजीला कंटाळली आहे. २०१४ मध्ये दिलेले एकही आश्वासन मोदी सरकारला पूर्ण करता आले नाही. त्यामुळे आता जनता मोदी आणि भाजपला प्रचंड कंटाळली आहे. ही जनताच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला घरी बसवणार आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.नाशिक शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष शरद अहेर यांच्या कन्येच्या विवाहास पृथ्वीराज चव्हाण यांनी हजेरी लावली.  हॉटेल लंडन पॅलेस येथे त्यांनी जाऊन वधुवरांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.

तीन राज्यांमध्ये कॉंग्रेसला मिळालेला विजय हे अध्यक्ष राहुल गांधी यांचेच यश आहे, असा दावाही त्यांनी केला. तत्पूर्वी औरंगाबाद येथे बोलताना चव्हाण यांनी पाच राज्यांतील निकालांनंतर कृंग्रेसची ताकद वाढली आहे. तरीही कॉंग्रेस येत्या निवडणुका मित्र पक्षांशी युती करूनच लढवणार आहे, असेही स्पष्ट केले. लोकशाही धोक्यात आणणाऱ्यांना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर मित्रपक्षांशी युती केली जाईल, असे ते म्हणाले.

Previous articleसरकार देणार प्रत्येकाला १५ लाख : रामदास आठवले
Next articleधनगर आरक्षणावरून राज्य सरकार तोंडघशी