म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडाचे ) अध्यक्षपद स्विकारल्यानंतर मुंबईतील सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणा-या विकासकांवर कारवाईचा बडगा उगारणा-या आणि म्हाडाला दलालांच्या विळख्यातून सोडविण्या-या उदय सामंत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यासंदर्भात आपल्या जीवाला धोका असल्याच्या तक्रारीचे पत्र त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांना पाठवले आहे.
गेल्या तीन महिन्यापूर्वी सरकारने शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे अर्थात म्हाडाचे अध्यक्षपदी नियुक्ती करून मंत्री पदाचा दर्जा दिला आहे. म्हाडा अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारताच उदय सामंत यांनी मुंबईतील वर्षानुवर्षे रखडलेल्या विविध प्रकल्पांना भेटी देवून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठका घेवून अनेक प्रश्न मार्गी लावले.जनतेचे प्रश्न सोडवितानाच फसवणूक करणा-या विकासकांवर कारवाईचा बडगा उगारत सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर त्यांनी म्हाडा भोवती असलेल्या दलालांवर करवाईचा बडगा उगारला. आणि सर्वसामान्य जनतेला दलालांच्या विळख्यातून सोडविले. असे अनेक जनहितार्थ निर्णय घेतल्याने समाजकंटक म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्यावर नाराज आहेत.या सर्व धडाडीच्या निर्णयामुळे म्हाडाची प्रतिमा सुधारू लागली असतानाच काही समाजकंटकाडून माझ्या जीवाला धोका असून, काही अज्ञातांकडून मला धमक्या आल्या असल्याचे उदय सामंत यांनी पत्रात म्हटले आहे.
सुरक्षा पुरविण्यात यावी यासाठी उदय सामंत यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून निवेदन दिले होते. त्यावर संबंधितांनी कार्यवाही करण्याचा आदेश त्यांनी संबंधितांना दिले आहेत. मंत्री पदाचा दर्जा असतानाही सुरक्षा पुरविण्यात न आल्याने उदय सामंत यांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांना पाठवले आहे.