जेव्हा…अजित पवार आणि जयंत पाटील लोकलने प्रवास करतात
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज संध्याकाळी मुंबईतील ट्रॅफिकमुळे लोकल ट्रेनमधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली असा प्रवास केला.
डोंबिवली येथे एका कार्यक्रमाला कारने जाण्यासाठी ट्रॅफिकचा अडथळा येवू शकतो त्यामुळे कार्यक्रमाला वेळेत पोचता येणार नाही हा विचार करुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार प्रकाश गजभिये, माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी प्रवास केला.