पाच नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी २७ जानेवारीला मतदान
मुंबई : कर्जत (जि. रायगड), मलकापूर (जि. सातारा), श्रीगोंदा (जि. अहमदनगर), आरमोरी (जि. गडचिरोली) या नगरपरिषदा व महादुला (जि. नागपूर ) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील ११ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या २७ जानेवारी २०१९ रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
सहारिया यांनी सांगितले की, २ ते ९ जानेवारी २०१९ या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. नामनिर्देनपत्रांची १० जानेवारी २०१९ रोजी छाननी होईल. मतदान २७ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत होईल. मतमोजणी २८ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.
पोटनिवडणूक होत असलेली नगरपरिषद, नगरपंचायतनिहाय जागा
राजापूर (जि.रत्नागिरी)- ६ अ, आळंदी (पुणे)- ९अ, फलटण (सातारा)- १२अ, दुधनी(सोालापूर)- २ ब, पन्हाळा (कोल्हापूर)- ८ क, दिंडोरी(नाशिक)- १५, यावल (जळगाव)- १अ, बीड- ११अ,बुलढाणा- १२ब, अर्जुनी (गोंदिया)- १४, गोरेगाव (गोंदिया) १४.