मुख्यमंत्र्यांना साखर कारखानदारीतील काही कळत नसावे : राजू शेट्टी
सांगली:ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी मिळावी, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले असून त्यांनी १ जानेवारीपासून तीव्र आंदोलन पुकारण्याचे घोषित केले आहे. या अगोदर शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री यांच्यापैकी खोटे कोण बोलत आहे?हे त्यांनीच सांगावे नाही तर मुख्यमंत्र्यांना साखर कारखानदारीतील काही कळत नसावे, असा टोला त्यांनी लगावला.
नितीन गडकरी जिल्हा दौऱ्यावर आल्यावर त्यांनी शेतकऱ्यांनी आता ऊस लावू नये. साखर जास्त झाली तर भविष्यात समुद्रात फेकण्याची वेळ येईल. त्यावरून शेट्टी यांनी टोला लगावला आहे.
साखरेला मागणी नाही असे सांगत कारखानदार एफआरपी देण्यास नकार देत आहेत, असा आरोप शेट्टी यांनी केला.कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे देणे बंधनकारक असतानाही तो न दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर आंदोलन करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.