राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नगरसेवकांवर लवकरच कारवाई : शरद पवार

राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नगरसेवकांवर लवकरच कारवाई : शरद पवार 

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणूकीत भाजपला पाठिंबा दिल्याने भाजप आणि राष्ट्रवादीच्या छुपी युतीचा आगामी निवडणेकीत परिणाम होवू नये म्हणून राष्ट्रवादी काॅग्रेस नगर मधिल १८ नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचे आज स्पष्ट झाले.पक्षादेश न पाळणा-यावर  येत्या आठ दिवसात कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिली.

नगरच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपाला पाठिंबा द्यायचा नाही,असे मी सांगितले होते.तरीही महापौर निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देण्यात आला. पक्षादेश नाकारणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून येत्या ५ दिवसांत संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.महापौर व उपमहापौर निवडुकीत राष्ट्रवादीने भाजपला साथ दिल्याने या दोन पक्षामध्ये छुपी युती असल्याचा संदेश  गेला होता. याचा मोठा फटका आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळेच या पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या १८ नगरसेवकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पक्षाची गेलेली पत परत मिळवण्यासाठी या नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले जावू शकते.

आज येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की, नगर निवडणुकीबाबत स्थानिक आमदारांनी मला संपूर्ण माहिती दिली होती.त्याच वेळी आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचे नाही असे स्पष्ट सांगितले होते. त्यानंतर भाजपला पाठिंबा दिल्याचे समजले. आता या पार्श्वभूमीवर नेत्यांची बैठक घेवून  पक्षादेश न ऐकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

Previous articleभीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद पुण्याला रवाना
Next articleएसटी कर्मचाऱ्यांना मिळणार मुलांच्या संगोपनासाठी सहा महिन्यांची रजा