व्हिडिओ गेम छोडो, मैदान से नाता जोडो : विनोद तावडे

व्हिडिओ गेम छोडो, मैदान से नाता जोडो : विनोद तावडे

मुंबई :  आजचे विद्यार्थी हे शाळा, अभ्यास संपला की विरंगुळ्यासाठी मैदानावर न दिसता व्हिडिओ गेम खेळताना दिसतात. हे चित्र बदलण्याची आवश्यकता असून स्वस्थ भारत घडण्यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानावर खेळ खेळले पाहिजे. व्हिडिओ गेम छोडो और मैदान से नाता जोडो, असे शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी व्हर्च्युअल माध्यमातून संवाद साधताना सांगितले.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांशी व्हर्च्युअल माध्यमातून संवाद साधला. आज २०१९ वर्षाचा पहिला दिवस असून या दिवसाच्या शुभेच्छा देताना येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्या.

 तावडे यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले, आठवड्यातील किमान एक दिवस तरी मुलांनी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे आणि म्हणूनच एक दिवस मैदानी खेळासाठी वेळ द्या. आज महाराष्ट्रात चांगले खेळाडू घडावेत यासाठी राज्य शासनाचा क्रीडा विभाग प्रयत्न करीत असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना नोकरीत ५ टक्के आरक्षण, पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना नोकरीमध्ये प्राधान्य अशा सूविधा देण्यात येत आहेत. चित्रकला, गाणे, नृत्य यापैकी काही आवडत असल्यास किंवा एखादा वेगळा छंद असल्यास तो नक्की जोपासला जाणे आवश्यक आहे. आज गायन, नृत्य आणि कला यामध्ये एलिमेंटरी परीक्षा दिली असल्यास शालेय परीक्षांमध्ये अधिकचे गुण देण्यात येत आहेत.

साधारणपणे तासभर चाललेल्या व्हर्च्युअल संवादातून शिक्षण मंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नवीन वर्षांत काय करणार आहे, अभ्यास कसा सुरु आहे, अभ्यासाव्यतिरिक्त काय करायला आवडते, कोणता खेळ खेळायला जास्त आवडतो, करीअर म्हणून कोणते क्षेत्र निवडणार, राजकारणात येणार का असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांना यादरम्यान विचारले. तर विद्यार्थ्यांनी सुध्दा शिक्षण मंत्री तावडे यांना तुम्ही राजकारणात कसे आलात, तुम्ही लहानपणी कोणते खेळ खेळायचात, तुमचा आवडता खेळ कोणता असे विविध प्रश्न विचारले.

Previous articleनव्या वर्षात विदेशी मद्य महागले
Next articleराष्ट्रवादीच्या दगाबाजीमुळे नगरमध्ये भाजपचा महापौर