केंद्र आणि राज्य सरकारचा पराभव निश्चित:छगन भुजबळ

 केंद्र आणि राज्य सरकारचा पराभव निश्चित:छगन भुजबळ

नाशिक: शेतमालाला दीडपट हमीभाव,वर्षाला दोन कोटी रोजगार, धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण,प्रत्येकाच्या बॅक खात्यात १५ लाख रूपये जमा करू,अशा अनेक खोट्या घोषणा करून सत्तेवर आलेल्या सरकारला धडा शिकवा. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचा पराभव निश्चित आहे, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. येवला येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

भुजबळ यांनी यावेळी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले की,नोटबंदीमुळे लहान उद्योजक अडचणीत आले. कित्येक निष्पाप लोकांचा बळी गेला.जीएसटीमुळे उद्योगधंदे बंद पडले.रोजगार मिळणे तर दूर,पण कित्येक तरूणांना रोजगार गमवावे लागले.सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची प्रगतीच्या दिशेने चाललेली वाटचाल थांबली, असा आरोप भुजबळ यांनी केला.

२०१६मध्ये आपल्याला सूडापोटी तुरूंगात धाडल्याचा आरोप त्यांनी केला.देशातील प्रमुख विरोधी  पक्षांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे कारस्थान देशभरात सुरू आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्र सदन वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. पंतप्रधान मोदी, राहुल गांधी तेथे बैठका घेतात.सरकारचा एकही पैसा नघेताही ही वास्तू उभारण्यात आली.तरीही त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला, असे भुजबळ म्हणाले.

Previous articleनगरपरिषदा-नगरपंचायती मधिल १४१६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावणार
Next articleउद्या मोदी सोलापुरात तर उद्धव ठाकरे मराठवाड्यात