बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा

मुंबई :बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी दादर येथील महापौर बंगल्याची जमिन स्मारक संस्थेला देण्याबाबत आज मुंबई महानगरपालिका व बाळासाहेब ठाकरे स्मारक विश्वस्त संस्थेदरम्यान करार झाला. यावेळी संस्थेचे सदस्य सचिव तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. या करार प्रक्रियेवेळी महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, सदस्य विशाखा राऊत, प्रकल्पाचे समन्वय सुधीर नाईक तसेच मुंबई महापालिका सचिव प्रकाश जेठे, उपायुक्त चंद्रशेखर चौरे, उपायुक्त पराग मसूरकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे उपस्थित होते.

शासनाने महापौर बंगला व परिसरात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्यानुसार आज महापौर बंगला व परिसरातील जमिन बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक विश्वस्त संस्थेला भाडेतत्वावर देण्याबाबत आज करार करण्यात आला. महापौर बंगला ही ऐतिहासिक वास्तू आहे. तिला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता परिसरातील जमिनीखाली बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारले जाणार आहे. या करारामुळे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्याला गती मिळणार आहे.

Previous articleपराभव दिसू लागल्याने मोदी फडणवीसांकडून जुमलेबाजी पार्ट -२ सुरुः खा. चव्हाण
Next articleजेव्हा परिवर्तन यात्रेत अजितदादा आणि धनंजय मुंडे नाईट वॉक करतात तेव्हा..!