मुंबई नगरी टीम
पुणे : भाजपाचे राज्यसभा सदस्य संजय काकडे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची आज भेट घेतल्याने अनेक चर्चांना ऊत आला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला मोठ्या भावासारखे आहेत. त्यांनी लाथ मारली तर मला दुसरे घर शोधावे लागेल असा इशारा खा. संजय काकडे यांनी दिला.
भाजपावर उघड उघड टीका करणारे खासदार संजय काकडे यांनी आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. भाजपाने माझा वापर केला अशी टीका करीत, मी पुण्यातुन लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला मोठ्या भावासारखे आहेत. त्यांनी लाथ मारली तर मला दुसरे घर शोधावे लागेल असा इशारा खा. काकडे यांनी दिला. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर अन्याय केला आहे. मुख्यमंत्री या दोघांचे ऐकून निर्णय घेणार असतील तर मला इतर पर्याय शोधावे लागतील. मुख्यमंत्र्यांनी डावलले तर मात्र मला माझा मार्ग मोकळा आहे असे काकडे यांनी म्हटले आहे. मला आणि माज्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. एवढे होवूनही मी यावर शांत आहे. मात्र मला लोकसभेसाठी उमेदवारी दिली नाही तर इतर पर्याय मोकळे आहेत असेही काकडे म्हणाले.मी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे असेही काकडे म्हणाले.