मुंबई नगरी टीम
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या शिवसेना-भाजपच्या युतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. शिक्कामोर्तब झाले. या दोन्ही पक्षांत पुन्हा युती झाल्यानंतर त्यांनी ट्विटरवरुन याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या असून, या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “अटल बिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुरदृष्टीने प्रेरीत होऊन पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत.”
भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुरदृष्टीने प्रेरीत होऊन या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा युती केली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि राज्याला भ्रष्टाचारमुक्त करण्यसाठी पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असे पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.