आमच्यासोबत यायचे की नाही ते काँग्रेसने ठरवावे
मुंबई नगरी टीम
जालना : राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या सभांना विराट गर्दी होत आहे.आमच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत असून आता आमच्यासोबत यायचे की नाही,हे काँग्रेसने ठरवावे,असे आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले आहे. जालना येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आनंदराज म्हणाले की,सत्तर वर्षांनंतर सर्व आंबेडकरी चळवळीतील विचारांचे नेते एकत्र आले आहेत.ज्या प्रस्थापितांनी दलित आणि वंचितांना सत्तेपासून दूर ठेवले,त्या सत्तेत दलित आणि शोषितांना बसवण्यासाठीराज्यात प्रकाश आंबेडकर यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे वंचित आघाडीसोबत यायचे की नाही हे काँग्रेसने ठरवायचे आहे,असे ते म्हणाले.रामदास आठवले यांनी स्वतः आपली किंमत कमी करून घेतल्याचा टोला त्यांनी लगावला.काँग्रेसने दिलेला आघाडीत येण्याचा प्रस्ताव आंबेडकर यांनी अद्यापही स्वीकारला नाही. रा.स्व.संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याचे लेखी वचन आंबेडकर यांनी मागितले आहे. काँग्रेसने अद्याप ही मागणी मान्य केलेली नाही.यावरून आघाडी अडकली आहे.