आगामी निवडणुकीत भाजपा शिवसेना युती जिंकेल

आगामी निवडणुकीत भाजपा शिवसेना युती जिंकेल

मुंबई नगरी टीम

मुंबई : गेल्या निवडणुकीत जेवढ्या जागा युतीने जिंकल्या त्यापेक्षा अधिक जागा आपण जिंकण्यासाठी प्रयत्नशील असलो पाहिजे, आगामी निवडणुकीत भाजपा शिवसेना युती जिंकेल त्यामुळे पूर्ण विश्वासाने कामाला लागा, असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या आमदारांना दिला आहे.

शिवसेना-भाजपच्या युतीच्या घोषणेनंतर काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी युतीच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या स्नेहभोजनाला शिवसेना भाजप आमदारासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते.

अविचारी लोकांची आघाडी होवू शकते मग समविचारी लोक का एकत्र येऊ शकत नाहीत, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करीत आपले पक्ष हिंदुत्वासाठी आपण एकत्र आले आहेत. त्यामुळे एकत्रितरित्या निवडणुकीच्या कामाला लागा, हे भगव वर्ष आहे असे ठाकरे म्हणाले. राज्यातील युती सरकारने आपल्या कार्यकाळात अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत त्या लोकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असेही ते या वेळी म्हणाले.

शिवसेना भाजप युतीची घोषणा झाल्यानंतर सर्वसामान्य जनते मध्ये असलेला संभ्रम दूर झाला आहे. विरोधकांनी आपल्या दोन्ही पक्षावर टीका केली तर ती टीका युतीवर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. गेल्या निवडणुकीत जेवढ्या जागा युतीने जिंकल्या त्यापेक्षा अधिक जागा आपण जिंकण्यासाठी प्रयत्नशील असलो पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Previous articleमहाराष्ट्रात पहिल्यांदा राजकीय पक्षाच्या प्रवक्तेपदी तृतीयपंथी
Next articleवायुदलाने केलेल्या धाडसी कारवाईचे विधिमंडळात अभिनंदन