मुंबई पोलीसांच्या ताफ्यात ३० “घोडेस्वार पोलीस”
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबई पोलीसांच्या ताफ्यात आता ३८ घोडेस्वार पोलीसांचा समावेश करण्यात येणार आहे.त्यामुळे लवकरच मुंबईच्या सुरक्षेसाठी हे घोडेस्वार पोलीस उपलब्ध होणार आहेत.सध्या उपलब्ध असणा-या मनुष्बळातून नविन घटक निर्णाण करण्यात आला आहे. गृह विभागाने आज त्यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला आहे.
मुंबईतील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्तांनी ३० आश्वासह मांउटेंड कॅाप्स ( घोडेस्वार पोलीस) या नविन घटकाच्या निर्मितीबाबत प्रस्ताव शासनाला सादर केला होता. त्यानुसार आता मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी मुंबईच्या रस्त्यांवर घोडेस्वार पोलीस दिसणार आहेत.माउटेंड कॅाप्स ( घोडेस्वार पोलीस ) घटकात १ पोलीस निरिक्षक,१ सहायक पोलीस उपनिरिक्षक, ४ पोलीस हवालदार, व ३२ पोलीस शिपाई असे एकूण ३८ अधिकारी कर्मचारी उपलब्ध होणार आहेत.या साठी एकूण ८२ लाख ४६ हजार आवर्ती तर १ कोटी १६ लाख ८३ हजार अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे. वरील कर्मचारी नायगाव विभागातील आस्थापनेतून मंजूर मनुष्यबळातुन वर्ग करण्यात येणार असून, हे घोडेस्वार पोलीस पोलीस आयुक्त, जलद प्रतिसाद पथक यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणार आहे.