शिवसेनेच्या २१ उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजपने काल आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर शिवसेनेने आज महाराष्ट्रातील २१ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात बहुतेक सर्व विद्यमान खासदारांना तिकीटे देण्यात आली आहेत. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण करणारे उस्मानाबादचे खासदार रविंद्र गायकवाड यांचा पत्ता कापण्यात आला आहे.त्याऐवजी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे.हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीवर नाराज होऊन शिवसेनेकडे आलेल्या निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सातारा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरीही तेथे नरेंद्र पाटील उत्सुक असल्याने तेथे उमेदवार जाहीर केला नाही. तर पालघर जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही.मात्र शिवसेनेने फारसा धोका न पत्करता मोदी लाटेवर निवडून आलेल्यांना उमेदवारी दिली आहे.युती झाल्यानंतर राज्यातील ४८ जागांपैकी भाजप २५ तर शिवसेना २३जागा लढवणार आहे.त्यापैकी २१उमेदवार शिवसेनेने घोषित केले आहेत.
शिवसेनेचे उमेदवार असे आहेत.
दक्षिण मुंबई -अरविंद सावंत
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
उत्तर-पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर
ठाणे – राजन विचारे
कल्याण – श्रीकांत शिंदे
रायगड – अनंत गीते
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत
कोल्हापूर – संजय मंडलिक
हातकणंगले – धैर्यशिल माने
नाशिक – हेमंत गोडसे
शिर्डी – सदाशिव लोखंडे
शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील
औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
बुलडाणा – प्रतापराव जाधव
रामटेक – कृपाल तुमाणे
अमरावती – आनंदराव अडसूळ
परभणी- संजय जाधव
मावळ – श्रीरंग बारणे
हिंगोली – हेमंत पाटील
उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर