एकनाथ गायकवाड यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
मुंबई नगरी टीम
मुंबई : गेल्या पाच वर्षात केंद्रातील भाजप सरकारने केवळ घोषणाबाजी केली असून, कसलेही विकासाचे काम केलेले नाही. संसदीय लोकशाही संसदीय लोकशाही न मानणा-यांना देशात वेगळ्या प्रकारची हुकूमशाही आणायची आहे हे जनतेला लक्षात आल्याने जनता आता भाजपा शिवसेना युतीचा पराभव करेल असा विश्वास दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील कॅांग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी व्यक्त केला.
कॅांग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी आज मोठे शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. कॅांग्रेस व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार म्हणून गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याप्रसंगी माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, आमदार वर्षा गायकवाड, हुकूमराज मेहता यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. चौथ्या टप्प्यातच्या निवडणूकीसाठी उद्या मंगळवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.