उर्मिला मातोंडकरने घेतली शरद पवारांची भेट

उर्मिला मातोंडकरने घेतली शरद पवारांची भेट

मुंबई नगरी टीम

मुंबई : उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी उर्मिला मातोंडकर यांनी त्यांची भेट घेतली.  पवार आणि उर्मिला मातोंडकर यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली.या भेटीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील राजकिय परिस्थितीवर चर्चा झाली असल्याचे समजते.

भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात कॅांग्रेसने अभिनेत्री उर्मिला मांतोंडकर यांना उमेदवारी दिल्याने उत्तर मुंबई मतदारसंघात एकतर्फी वाटणारी लढत आता रंगतदार वळणावर पोहचली आहे. मातोंडकर यांनी उमेदवारी जाहीर होताच मतदार संघ पिंजून काढला आहे. त्यांनी सध्या गाठीभेटींवर भर दिला असून शरद पवार यांच्या निवासस्थानी  जावून उर्मिला मातोंडकर यांनी त्यांची भेट घेतली. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात मराठी मतदारांच्या संख्या निर्णायक ठरणार असल्याने उर्मिला यांनी पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाच्या विरोघात घेतलेली  भूमिका उर्मिला मातोंडकर यांच्या पथ्यावर पडणारी असल्याने या मतदार संघात राज ठाकरे यांनी सभा घ्यावी अशी विनंतीही त्यांनी याभेटीत  पवारंकडे केली असल्याची चर्चा  आहे. गेल्या २०१४ च्या मोदी लाटेल भाजपाचे गोपाळ शेट्टी विक्रमी मतांनी निवडून आले होते. मात्र यावेळी कसलीही लाट नसल्याने या मतदारसंघात मराठीचा मुद्दा  निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मनसे उघड उघड उर्मिला  मांतोंडकर यांचा प्रचार करणार असल्याची चर्चा आहे.

 

Previous articleपहिला टप्प्यासाठी ३ वाजेपर्यंत ४६.१३ टक्के मतदान
Next articleयुनायटेड फॉस्फरस लि. आणि भाजपचे घनिष्ठ संबंध